गरीबांसाठी रविंद्र वायकरांची 'संवेदना'

 Jogeshwari
गरीबांसाठी रविंद्र वायकरांची 'संवेदना'

जोगेश्वरीमध्ये शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी गरीबांसाठी 'संवेदना' संस्था सुरु केली आहे. या संस्थेद्वारे गरीबांना जेवण, कपडे, औषध त्याचबरोबर मोफत पुस्तके देखील देण्यात येणार आहेत. मंगळवारी या संस्थेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्याहस्ते गरीबांना अन्न आणि कपड्यांचं वाटप करण्यात आलं.

दरम्यान, तुम्हीही आपले जुने कपडे, पुस्तके आणि तुमच्या घरातील जुन्या वस्तू या संस्थेला देऊन गरीबांना मदत करू शकता असं आवाहन संस्थेकडून करण्यात आलं आहे.

Loading Comments