चेंबूरमध्ये मनसेचे उपोषण

Govandi
चेंबूरमध्ये मनसेचे उपोषण
चेंबूरमध्ये मनसेचे उपोषण
चेंबूरमध्ये मनसेचे उपोषण
See all
मुंबई  -  

गोवंडी - देवनार मनपा कॉलनीतील दिवंगत बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्याच्या निषेधार्थ मनसेचे कार्यकर्ते बुधवारी चेंबूरच्या महापालिका कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत. भ्रष्टाचारामुळे मैदानाची दयनीय अवस्था झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. या मैदानात जॉगिंग ट्रॅक, झाडे, सुरक्षा भिंत, सुशोभिकरण, गेट इत्यादी होणार होते. मात्र अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचा आरोप मनसे नेते सतीश नारकर यांनी केलाय. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मनसेने केली. दरम्यान जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेण्यार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.