उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईकस्वाराने धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील शिवसेना भवनासमोर हा प्रकार घडला असून बाईकस्वाराची सध्या कसून चौकशी केली जात आहेत. या अपघातात बाईकस्वाराला कसलीही दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितनुसार, आदित्य ठाकरे आज शिवसेना भवन येथे येत असताना गाडीच्या मागून आलेला बाईक स्वार आदित्य ठाकरे यांच्या गाडीला धडकला. शिवसेना भवन येथील सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे उजव्या बाजूला वळण घेत होते.
#मुम्बई के दादर इलाके में आदित्य ठाकरे की गाड़ी हुई हादसे का शिकार..#शिवसेना भवन के पास #आदित्यठाकरे की गाड़ी को बाइक सवार ने मारी टक्कर..
— MANISH YADAV (@Manishupkhabar) June 28, 2023
आदित्य ठाकरे शिवसेना भवन की तरफ जा रहे थे,तभी पीछे ने बाइक सवार ने मारी टक्कर..
पुलिस ने बाइक चालक को लिया हिरासत में.. pic.twitter.com/771m3MeIWV
दुचाकीस्वाराने कारला धडक दिल्यानंतर त्याने घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडले. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा कर्मचार्यांना दुचाकीस्वाराला पकडण्यात यश आले. आदित्य ठाकरे यांच्या वाहनाला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी दुचाकीस्वाराशी बोलून त्याची प्रकृती जाणून घेतली. ठाकरे यांचा ताफा पुढे गेल्यानंतर पोलिसांनी या दुचाकीस्वाराच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.
आदित्य ठाकरे यांचे वाहन शिवसेना भवनाच्या दिशेने उजवे वळण घेण्यासाठी जात होते. त्यामुळे त्यांच्या वाहनाचा वेग मंदावला होता. मात्र, अचानक एक दुचाकीस्वार मागून भरधाव वेगाने आला. पुढे न पाहता दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला पण आदित्य ठाकरे यांच्या गाडीला धडकला. अपघातानंतर दुचाकीस्वार दुचाकीवरून खाली पडला. तत्काळ आदित्य ठाकरे यांचे सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणाचीही हानी झाली नाही.
या घटनेवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून, ही एक सामान्य घटना आहे.