काॅंग्रेस शॉक्स, सेना रॉक्स

  BMC
   काॅंग्रेस शॉक्स, सेना रॉक्स
  मुंबई  -  

  फोर्ट - मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सोमवारी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाली. या प्रभाग आरक्षणात ए वॉर्डमध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे, शिवसेनेला मात्र फायदा झाल्याचे चित्र आहे.

   ए वॉर्डमध्ये 2012 महापालिका निवडणुकीत 5 प्रभाग होते. मात्र ते आता कमी होऊन तीन वर आले आहेत. यात प्रभाग क्रमांक 225 च्या काँग्रेसच्या नगरसेविका सुषमा विनोद शेखर, काँग्रेसचे नगरसेवक जावेद जुनैजा वॉर्ड क्रमांक 223, शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 224 नगरसेवक गणेश सानप यांच्या प्रभागात फेरबदल करण्यात आला आहे. वॉर्ड पुर्नरचनेत 223 व 224 कमी करण्यात आले आहे. तर 225 हा अनुसुचित जाती जमाती महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे.
  दरम्यान, " प्रभाग पुर्नरचनेत प्रभाग कमी झाला असला तरी समाजिक कार्य करण्यासाठी पदाची आवश्यकता नसते, तर इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. पक्षाने कोणतीही जबाबदारी दिल्यास मी ती स्वीकारेन", असे प्रभाग क्र. 225 चे शिवसेना नगरसेवक गणेश सानप यांनी सांगितले.
  तर "अनुसुचित जाती जमातीसाठी आमचा वॉर्ड आरक्षित झाला असला तरी आम्ही निवडणुकीसाठी कोणत्याही वॉर्डचा विचार केला नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. आम्ही दोघेही आगामी निवडणूक लढवणार नाही", असे काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद शेखर यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.