Advertisement

युती तुटली... शिवसेना स्वबळावर लढणार


युती तुटली... शिवसेना स्वबळावर लढणार
SHARES

गोरेगाव - पालिका निवडणुकांसाठी भाजपा-शिवसेना युती होणार की तुटणार या प्रश्नांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमध्ये झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात भाजपावर जोरदार टीका करत यापुढे शिवसेना भाजपासोबत युती करणार नसल्याचे सांगत काडीमोड घेतला. ‘तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतो आहे की, आता यापुढे शिवसेना स्वबळावर महाराष्ट्रात भगवा फडकवेल. कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरं घेऊन जाणार नाही. महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाशी काडीमोड घेतला. महापालिका असो वा जिल्हा परिषदा आता युती करणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पारदर्शकतेवरही खरपूस टीका केली.

 

रामदास कदम

उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतलाय तो ऐतिहासिक आहे. या निर्णयाचे स्वागत महाराष्ट्राने केले आहे. जो घोडा आणि बैल उसळलेला आहे त्याला वेसण घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 25 वर्ष झालेली नुकसान भरपाई आम्ही भरून काढू. भविष्यात महाराष्ट्रात लाट फक्त भगव्याची असेल हे आम्ही दाखवून देऊ.


दिवाकर रावते

शिवसेना पक्ष प्रमुखांचा आदेश आहे आणि आम्ही त्या आदेशाचे पालन करणार. शिवसेना त्याच जल्लोषाने पुढेही काम करेल. आम्हाला सत्ता महत्त्वाची नाही. जनतेच्या कामासाठी आम्ही लढू.


चंद्रकांत खैरे

उद्धव ठाकरेंच्या निर्णयाने सर्व शिवसैनिक उत्साहात आहेत. त्यांचात एक वेगळा जोश पाहायला मिळतोय. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न आता पूर्ण होईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा