SHARE

शिवडी - युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवडी विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी रात्री बाईक रॅली काढली.

या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण वर्ग सहभागी झाला होता. तर एक हजाराहून अधिक बाइकस्वार शिवसेनेचा झेंडा घेऊन प्रचार रॅलीत सहभागी झाले. लालबाग येथील गणेश टॉकीजपासून या रॅलीला सुरुवात झाली. तर पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल टीटी, जेरीबाई वाडिया रोड, भोईवाडा नाका, शिवडी नाका अशा 19 भागांतून ही बाइक रॅली काढण्यात आली. दरम्यान 'शिवसेनेचा विजय असो, एकच पक्ष शिवसेना फक्त' अशा घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार अजय चौधरी, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह शिवडी मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीची सांगता भारतमाता सिनेमा येथे करण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या