मुख्यमंत्री महोदय मला तुमची लाज वाटते - उद्धव ठाकरे

  Goregaon
  मुख्यमंत्री महोदय मला तुमची लाज वाटते - उद्धव ठाकरे
  मुंबई  -  

  गोरेगाव -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘वाघाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, कधी पंजा मारेल ते समजणारही नाही. आम्ही मुंबईत शेर आहोत, आणि बाहेर पण आम्हीच शेर,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला तुमच्यात हिंमत आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी खास शैलीत हे उत्तर दिले.

  ‘सर्जिकल स्ट्राईक हे आम्हाला शिकवणार का? लाज वाटावी असे मुख्यमंत्री सर्जिकल स्ट्राईक बाबत वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्री महोदय मला तुमची लाज वाटते. इतके निर्लज सरकार कधीच पाहिले नाही. मला नोटाबंदीचा फटका बसला, कारण रांगेत ज्या लोकांचा मृत्यू झाला, हाच माझ्यासाठी मोठा फटका आहे. नोटाबंदीमुळे रांगेत 200 लोकांचा मृत्यू झाल्याचा मला त्रास झाला. मला नोटाबंदीचा फटका किती बसला आहे, हे तुम्हाला 23 तारखेला निकालानंतर कळेल," असा टोलाही उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.