Advertisement

शिवसेनेकडून मोफत आधारकार्ड वाटप


शिवसेनेकडून मोफत आधारकार्ड वाटप
SHARES

कमाठीपुरा - शिवसेना शाखा क्रमांक 213 च्या वतीनं सी विभागात सोमवारी सकाळी तिथल्या रहिवाशांना मोफत आधारकार्ड आणि स्मार्टकार्डचं वाटप करण्यात आलं. कामाठीपुरातल्या बापटीरोड इथल्या सिद्धार्थनगर सोसायटीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. उप-विभागप्रमुख राजू फोडकर, शाखाप्रमुख, शाखासंघटक, युवासेना विभाग अधिकारी आणि माजी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयेजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. तसंच अनेक विभागातील शिवसेना कार्यकर्तेही योजनेचा लाभ घेत आहेत असं उप विभागप्रमुख राजू फोडकर यांनी सागितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement