चोर बाजारात शिवसेनेची प्रचारसभा

 Mumbai
चोर बाजारात शिवसेनेची प्रचारसभा
Mumbai  -  

चोर बाजार -  चोर बाजार, भेंडी बाजार परिसरात मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना शिवसेनेने काय केल हे सांगण्यासाठी शनिवारी गरम बाजार, चिमना बुचर स्ट्रीट येथे प्रभाग क्रमांक. 220 शिवसेना उमेदवार सुरेंद्र बागलकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे वाहतूक अध्यक्ष हाजी अराफत शेख व मुस्लिम समाजातील अन्य नेते उपस्थित होते. या सभेत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव उपस्थित होते. उर्दु माध्यमातील विद्यार्थी आता अभ्यास पुस्तकातून नाही तर टॅब मधून अभ्यास करायला लागले आहेत. हे फक्त शिवसेनेमुळे झाले आहे त्यामुळे कमाळाबाई सोबत न जाता धनुष्य बाणाला मत देऊया असे अवाहन त्यावेळ तिथल्या नागरिकांना केले.

Loading Comments