'राजीनामे खिशात घेऊनच फिरत आहोत'

  Malabar Hill
  'राजीनामे खिशात घेऊनच फिरत आहोत'
  मुंबई  -  

  मुंबई - शिवसेना मंत्र्यांनी बुधवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, रामदास कदम, दिपक सावंत आणि दिपक केसरकर यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा यावर चर्चा केली. भाजपाने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं असं आश्वासन दिलंय. पण, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ का केलं जात नाही या मुद्द्यावर शिवसेना मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले.

  याच वेळी शिवसेनेचे मंत्री राजीनामा देणार की काय अशीही चर्चा रंगली होती. यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना विचारलं असता त्यांनी खिशातून राजीनामा काढून दाखवला. शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरतात असा दावा देखील दिवाकर रावते यांनी केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.