Advertisement

शिवसेनेचा वचननामा फेक- संजय निरुपम


शिवसेनेचा वचननामा फेक- संजय निरुपम
SHARES

सीएसटी - शिवसेनेने सोमवारी जाहीर केलेला जाहीरनामा फेक असून नागरिकांची दिशाभूल करणारा असल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. भाजप शिवसेनेने 2012 मध्ये जो वचननामा जाहीर केला होता , त्यात 14 फ्लायओव्हर बांधण्याचे जाहिर केलं होतं. पण, प्रत्यक्षात एकही पूल बांधला नाही. जे पूल ते सत्तेवर आल्यावर बांधले त्यांची अर्धी कामं काँग्रेस सरकारच्या काळात झाली होती. जोगेश्वरी पूलाच्या नामकरणावरून भाजप आणि शिवसेनेत वाद झाले. ते कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्याला शोभेल असे नव्हते. 2012 मध्ये गारगाई आणि पिंजार हे दोन नवीन जलाशय बांधणार आणि 1 हजार एमलडीसीपेक्षा जास्त पाणी मुंबईला पुरवठा करणार होते. पण, तेही काम झालं नाही. देवनार डम्पिंगचा प्रश्न जैसे थे आहे. मुंबईतील तीन डम्पिंग ग्राउंडवर बांधण्यात येणारे वीजप्रकल्प देखील प्रलंबित आहेत. मुंबईतील तीन प्रमुख नदयांचे सौंदर्यीकरणाचा प्रश्न जैसे थे असून मल:निसारण प्रकल्प कागदावरच राहिला. मल:निसारण, डम्पिंग प्रश्न, नाल्याची दुरवस्था, पालिका रुग्णालयं यांच्या सदयस्थितीवर निरुपम यांनी निशाणा साधला. फ्री आरोग्य सेवा, हेल्थ कार्ड अद्याप युती सरकारने दिले नाही. मुंबईतील 35 पालिका शाळा बंद झाल्या. 20 वर्षात महापालिका आणि शिवसेनेने मुंबईला आपत्तीग्रस्त बनवून ठेवलेय अशा शब्दांत निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपावर निशाणा साधला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा