'महापालिकांचा थकित निधी द्या'

  Mumbai
  'महापालिकांचा थकित निधी द्या'
  मुंबई  -  

  मुंबई - भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये तह जरी झाला असला तरी एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. मुंबई महापालिकेचे 61 हजार कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवल्याचा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी केला होता. तर गुरुवारी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

  मुंबई महानगरपालिकेच्या कराच्या आणि अनुदानाच्या रुपाने येणे असलेल्या 3 हजार 523 कोटी 31 लाख रुपये इतकी रक्कम अर्थसंकल्पात तरतूद करुन महानगरपालिकेस वर्ग करण्यात यावा. तसेच 2016-17 या वर्षात शासनाच्या विविध कार्यालयांकडून 3 हजार 523 कोटी 31 लाख रुपये एवढी रक्कम थकीत आहे. त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाकडून 2 हजार 44 कोटी रुपये आणि शासनाच्या विविध कार्यालयाकडून मालमत्ता कर आदी रक्कम शासनाकडून येणे आहे. परंतु अद्यापही ही रक्कम महानगरपालिकेस प्राप्त झालेली नाही. महानगरपालिकेस थकीत असलेला निधी विनाविलंब मिळावा यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करुन महापालिकेस देण्यात यावी. या निधीतून महानगरपालिकेचे आवश्यक असलेले विकासकाम मुंबईकरांसाठी पूर्ण झाल्यास मुंबईकर या पारदर्शक भूमिकेबाबत आपणास धन्यवाद देतील, असे पत्रात नमूद केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.