भाजपाचा पारदर्शकतेचा बुरखा फाडणार - अनिल परब

  Mumbai
  भाजपाचा पारदर्शकतेचा बुरखा फाडणार - अनिल परब
  मुंबई  -  

  दादर - अल्पमतात असणाऱ्या भाजपाच्या सरकारने कोणती डील करून विधानसभेत बहुमत सिद्ध केलं, या बद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करून पारदर्शकता आणावी असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. तसेच पारदर्शकतेच्या नावावर युती तोडल्याचा दावा खोटा असल्याचं म्हणत शिवसेना आमदार आणि विभाग प्रमुख अनिल परब यांनी भाजपावर जोरदार टीका केली. युती तुटल्यानंतर मुख्यमंत्र्यांना उपरती सुचली असल्याचंही ते यावेळी म्हणालेत.

  नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात महापालिकेने भ्रष्ट्राचार केला आहे त्याबद्दल मी नागपूरचा संपर्क प्रमुख म्हणून चौकशी करावी, अशी मागणी केली होती. अजून उत्तर मिळालं नसल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. नागपूरच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्यावर दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली नाही. ओसीडब्ल्यू कंपनीचे नागपूर महापालिकेशी कंत्राट झाले आहे. ती कंपनी कोणाची आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच नागपूर शहराला 24 तास पाणी देण्याची अट होती, अजून नागपूरमध्ये 24 तास पाणी मिळत नाही. कंपनीसाठी 4 रुपयांचा दर 22 रुपये करण्यात आला. नागपूरमधील रस्ते, पाणी, डांबर घोटाळा अशी बरेच प्रकरण आहेत. मुख्यमंत्री असलेल्या नागपूरमध्ये अशी परिस्थिती आहे तर मुंबईमध्ये काय सुधार करणार या प्रश्नांची उत्तरे भाजपाने जनतेला द्यावीत नाहीतर शिवसेना यापुढे भाजपाच्या पारदर्शकतेचा बुरखा लवकरच फाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.