Advertisement

प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत पुन्हा शिवसेना-भाजपाच


प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत पुन्हा शिवसेना-भाजपाच
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यात झालेल्या आठ प्रभाग समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये निम्म्या जागांवर भाजपाचे नगरसेवक अध्यक्ष म्हणून निवडून आले असून, शिवसेनेचे तीन आणि मनसेच्या एका अध्यक्षाचा समावेश आहे.

महापालिकेच्या आठ प्रभागांपैकी एल आणि के पूर्व प्रभागांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या. उर्वरीत सहा प्रभागांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज भरले नव्हते. त्यामुळे या सहा ठिकाणी अध्यक्षांची निवड ही बिनविरोध होणार होती, हे स्पष्ट झाले होते. परंतु के/पूर्व प्रभागात काँग्रेसच्या सुषमा कमलेश यादव यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे भाजपाच्या उज्ज्वला मोडक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

शिवसेनेची मनसेला साथ
प्रभाग एलमधून अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून मोरजकर, मनसेचे दिलीप लांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ.सईदा खान निवडणूक रिंगणात उतरले होते. परंतु मनसेच्या उमेदवाराला शिवसेनेने साथ देत आपल्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास सांगितले. त्यानुसार शिवसेना उमेदवार मोरजकर यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतला. शिवसेनेने मनसेला साथ दिल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवकही निवडणुकीला वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे डॉ.सईदा खान यांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनसेचे दिलीप लांडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी जाहीर केले.

प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झालेले नगरसेवक

जी/उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष - मिलिंद वैद्य (शिवसेना)
एच /पूर्व व एच पश्चिम /प्रभाग समिती अध्यक्ष - संजय अगलदरे (शिवसेना)
के /पूर्व प्रभाग समिती अध्यक्ष - उज्ज्वला मोडक (भाजपा)
के/पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष - योगीराज दाभाडकर (भाजपा)
एम/ पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष - सुषम सावंत(भाजपा)
एल प्रभाग समिती अध्यक्ष - दिलीप लांडे (मनसे)
एन प्रभाग समिती अध्यक्ष - तुकाराम पाटील (शिवसेना)
एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्ष - समिता कांबळे (भाजपा)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा