भाजपा- शिवसेनेचा ‘का....रे...दुरावा’

 Ghatkopar
भाजपा- शिवसेनेचा ‘का....रे...दुरावा’
भाजपा- शिवसेनेचा ‘का....रे...दुरावा’
See all

घाटकोपर - भटवाडीमध्ये बुधवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शाखांना भेटी दिल्या. यावेळी उद्धव ठाकरेंनी नवीन प्रभाग रचनेचा आढावा देखील घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घाटकोपरमध्ये येणार म्हटल्यावर शिवसैनिकांनी राम जोशी मार्गाच्या सुरुवातीला भाजपानं लावलेले ‘महाराष्ट्र बदलतोय’, ‘सरकार आपल्या दारी’ पालिका निवडणुका जिंकल्यानंतर प्रभाग 128 चा कशाप्रकारे विकास करणार आहे हे होर्डिंग्ज काढले. गेल्या 15 दिवसांपासून हे होर्डिंग्ज येथे लावण्यात आले होते, मात्र शिवेसेना आम्हाला घाबरत असल्यानं त्यांनी आमचे बोर्ड काढल्याचा आरोप घाटकोपर पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष रवी पूज यांनी केलाय. या सर्व प्रकाराबाबात एन वॉर्ड ऑफिसमध्ये चौकशी केली असता त्यांनी होर्डिंग्स संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केली.

Loading Comments