शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार आशिष चेंबूरकर?

Mumbai
शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार आशिष चेंबूरकर?
शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार आशिष चेंबूरकर?
शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार आशिष चेंबूरकर?
See all
मुंबई  -  

मुंबई - मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपाकडून सत्तेचा दावा केला जात असला प्रत्यक्षात कुणाची सत्ता येणार हे अजुनही गुलदस्त्यातच आहे. परंतु आता शिवसेनेकडून महापौरपदाची दावेदारी ठोकली जात असून यासाठी शिवसेनेकडून वरळीतील विभागप्रमुख, नगरसेवक आशिष चेंबूरकर यांचे नाव आघाडीवर आहे. चेंबूरकर हेच शिवसेनेचे उमेदवार असतील. शिवसेना पक्षप्रमुखांनीही यावर शिक्कामोर्तब केला असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे.

मुंबई महापालिकेच्या सत्तेची समिकरणे शिवसेना-भाजपाकडून जुळवली जात आहे. चार अपक्षांसह शिवसेनेचे एकूण 88 तर अभासे आणि एक अपक्ष नगरसेवकासह भाजपाचे एकूण 84 नगरसेवक संख्या झाली आहे. त्यामुळे सध्या शिवसेना हा महापालिकेतील मोठा पक्ष असला तरी एकेक घोडे पळवण्यापेक्षा तबेलाच उचलून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे भाजपा कोणत्या पक्षाचे नगरसेवक फोडते हेच पाहायचे आहे.

महापौरपदासाठी शनिवारी सहावाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे. शिवसेना हा पक्ष मोठा असल्यामुळे महापौरपदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. महापौरपदासाठी शिवसेनेकडून मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर, रमेश कोरगावकर, विश्वनाथ महाडेश्वर, विशाखा राऊत, शुभदा गुडेकर, किशोरी पेडणेकर आदींची नावे चर्चेत होती. परंतु प्रत्यक्षात आशिष चेंबूरकर यांच्या नावावर पक्षाने सहमती दर्शवली गेली आहे. चेंबूरकर हे विभागप्रमुख असून त्यांनी आपल्या विभागातील 16 पैकी स्वत:सह 13 नगरसेवक निवडून आणले आहेत. चेंबूरकर यांच्याप्रमाणे किशोरी पेडणेकर यासुद्ध या विभागाच्या महिला संघटक आहेत. त्यामुळे चेंबूरकर यांना महापौर बनवून पुन्हा एकदा महापौरपदाचा बहुमान वरळी-लोअरपरळ भागाला देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.


काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल लोकरे

महापौरपदाच्या या निवडणुकीत 31 नगरसेवक निवडून आलेला काँग्रेस पक्ष शिवसेनेला साथ देईल, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा न देता आपला उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे महापौरपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसच्यावतीने विठ्ठल लोकरे यांचे नाव पक्षाने जाहीर केले आहे. काँग्रेसच्या या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा दिला जाणार आहे. काँग्रेसचे निरुपम हे आपल्या संपर्कात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्पष्ट केले आहे.


मनसेही उतरणार महापौरपदाचा उमेदवार

महापौर निवडणुकीत मनसे कुणाला पाठिंबा देते तर्क वितर्क लढवले जात असतानाच मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांनीही महापौरपदासाठी अर्ज घेतला आहे. त्यामुळे महापौरपदासाठी मनसेच्यावतीनेही उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनीही मनसेला गृहीत धरू नये, असे सांगून मराठी महापौराला आपण मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.