Advertisement

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन

हिंदूजा रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन
SHARES

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालं आहे. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले गेलं होतं. हिंदूजा रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 

मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते आहेत.  तीन टर्म विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिलेवहिले मुख्यमंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवली होती.

या काळात  भ्रष्टाचाराचे आरोप आणि बाळासाहेबांची नाराजी यामुळे मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द पूर्ण करण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला होता.

पुढच्या निवडणुकीत त्यांना लोकसभेवर पाठवण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री, लोकसभा सभापती अशी अनेक पदे त्यांनी सांभाळली. उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत देखील त्यांचे नाव चर्चेत होतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा