परिचारकांविरोधात शंभूसेनेची निदर्शने

 Azad Maidan
परिचारकांविरोधात शंभूसेनेची निदर्शने
Azad Maidan, Mumbai  -  

आझाद मैदान - भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात शंभूसेनेने बुधवारी आजाद मैदानात निदर्शने केली. पंढरपूर येथे एका प्रचारसभेत भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवरील जवानांच्या पत्नींविषयी अपमानकारक आणि वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांचे विधानपरिषदेचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी शंभूसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. परिचारक यांचं निलंबन न केल्यास शंभुसेना त्यांच्या तोंडाला काळे फासणार आहे. परिचारक यांना निलंबित करण्यास सरकारने वेळ लावल्यास शंभूसेना संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडेल, असा इशारा शंभू सेनेचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. युवराज कदम पाटील यांनी दिला.

Loading Comments