गुरमेहर प्रकरणी शरद पवारांची मोदींवर टिका

 Nariman Point
गुरमेहर प्रकरणी शरद पवारांची मोदींवर टिका

नरिमन पॉईंट - दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी गुरमेहर कौरच्या बचावासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सरसावले आहेत. नरिमन पॉईंटमधील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये पत्रकारांशी बातचित करताना त्यांनी सांगितले की ज्या प्रकारे गुरमेहेरला टार्गेट केले जाते ते पूर्णपणे निषेधार्थ आहे. 

लोकशाही आणि स्त्री सन्मान करणाऱ्या लोकांनी या प्रवृत्तीच्या विरोधात लढले पाहिजे. सांप्रदायवाद दहशतीच्या माध्यमातून पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यकर्त्यांची जास्त जबाबदारी आहे. समाजातील वेगळी भूमिका येत असेल तर स्वीकारणे गरजेचे आहे. तर, सध्याचे राज्यकर्ते कटुता वाढविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, अशी टीका करून शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला.


Loading Comments