Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

शरद पवारांवर यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर सोमवारी दुसरी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.

शरद पवारांवर यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर सोमवारी दुसरी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून सध्या ते ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी दिली. 

पोटदुखीच्या तक्रारीनंतर गेल्या महिन्यात शरद पवार (sharad pawar) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वैद्यकीय चाचणीत शरद पवार यांना गॉल ब्लँडर म्हणजेच पित्ताशयातील खड्यांचा त्रास होत असल्याचं समोर आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. त्यानुसार ३० मार्च रोजी रात्री त्यांच्यावर एन्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ३ एप्रिलला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. डाॅक्टरांनी त्यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. सोबतच दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी त्याचवेळी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार रविवारी शस्त्रक्रियेसाठी त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

त्याप्रमाणे सोमवारी सकाळी त्यांच्यावर डॉ. बलसारा यांनी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर पवारांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होत आहे, असं नवाब मलिक यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं आहे.


हेही वाचा-

कोरोनाला आळा घाण्यासाठी मुंबई महापालिकेचा 'Action Plan'

राज्यात पुढच्या २ दिवसांत लॉकडाऊन लागण्याचे संकेत


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा