बोरीवलीत दिग्गजांमध्ये एफआयआर वॉर

 Mumbai
बोरीवलीत दिग्गजांमध्ये एफआयआर वॉर
Mumbai  -  

बोरीवली - प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवार शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या चेतन परमार आणि शिवकुमार यादव यांच्या विरोधात एमएचबी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी दारु पिऊन शिवीगाळ केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे. तसेच रविवारी मध्यरात्री तीन वाजता गणपत पाटील नगरमधील शिवसेनेच्या तात्पुरत्या कार्यालयात लोकांना बोलावून धमकावत असल्याची माहितीही दिली. तेथून घरी जात असताना या दोघांनी माझा घरापर्यंत पाठलाग केला असाही आरोप शीतल म्हात्रे यांच्या एफआयआरमध्ये आहे. पोलिसांनी गणपत पाटील नगरमधील शिवसेनेच्या कार्यालयात जाऊन या दोघांना ताब्यात घेतलं आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं. तर,शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनीही शीतल म्हात्रे यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. या प्रभागातून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Loading Comments