भाजपा आमदार तारासिंह यांना शिवसैनिकांचा घेराव

 Mulund
भाजपा आमदार तारासिंह यांना शिवसैनिकांचा घेराव

मुलुंड - भाजपा आमदार तारासिंह यांना शिवसैनिकांनी घेराव घातला. तारासिंह यांनी निवडणूक केंद्रात घुसून मतदारांना भाजपालाच मतदान करा असं आवाहन केलं असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तसंच शिवसैनिकांनी केंद्राबाहेर तारासिंह यांना घेराव घालत घोषणाबाजीही केली. मुलुंडच्या गव्हाणपाडा महानगरपालिका शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर हा संपू्र्ण प्रकार घडला. या सर्व गोंधळानंतर तारासिंह यांनी या केंद्रावरुन काढता पाय घेतला.

Loading Comments