'...अन्यथा रस्त्यावर उतरू'

 Pali Hill
'...अन्यथा रस्त्यावर उतरू'
'...अन्यथा रस्त्यावर उतरू'
See all

मुंबई - दिवाळीच्या तोंडावर झोपडपट्टीवासियांना बेघर करणारी कारवाई थांबवा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि त्यानंतर जे काही होईल त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा कडक इशारा गुरूवारी शिवसेनेनं पालिका प्रशासनासह भाजपला दिलाय. 14 फुटांपेक्षा उंच इमारतींवरील कारवाई थांबवावी यासाठी शिवसेनेनं आग्रही भूमिका घेतलीय. गुरूवारी वांद्रेमधील महाराष्ट्रनगरमध्ये झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, आमदार सुनील प्रभू यांच्यासह अन्य नेत्यांनी आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेतली आणि कारवाई थांबवण्याची मागणी केली. तर पाच वर्षात ही कारवाई का झाली नाही, आता निवडणुकीच्या तोंडावरच अशी कारवाई का? अस प्रश्न शेवाळे यांनी उपस्थित केला. तसंच शिवसेनेवर खापर फोडून आपली पोळी भाजून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोपही शेवाळे यांनी केलाय.

भाजप-शिवसेनेतील वाद पेटला

शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केल्याबरोबर पालिकेतील शिवसेना-भाजपमधील वाद पेटला आहे. एकीकडे महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्तांना पत्र लिहित पालिकेत माफिया आणि दलालराज असल्याचा गंभीर आरोप काही जणांकडून होत असल्यानं याबाबतीत सत्य मुंबईकरांसमोर ठेवावं, अशी मागणी केली आहे. या पत्राद्वारे महापौरांनी भाजपच्या किरीट सौमय्यांवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे झोपड्यांच्या मुद्दयावरून भाजप-शिवसेना आमने-सामने आली आहे. त्यामुळे आता पालिका निवडणुकीसाठी या पक्षांची भूमिका काय असेल हेच पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Loading Comments