शाब्बास वहिनी 2017

 Jogeshwari
शाब्बास वहिनी 2017

जोगेश्वरी - जागतिक महिला दिनाचे औचित्य जोगेश्वरीत सोमवारी शाब्बास वहिनी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जोगेश्वरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोगेश्‍वरीतील शिवाई मैदान येथे मनिषा वायकर यांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. या वेळी विभागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.


या वेळी उपांत्य फेरीतील विजेत्या आणि स्पर्धेत सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. या स्पर्धेत सुमारे 2 हजार 500 महिलांनी सहभाग घेतला होता. तसेच या वेळी आयोेजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ सुमारे दीड लाख महिलांनी घेतला. स्पर्धेची अंतिम फेरी 8 मार्च रोजी जोगेश्वरीतल्या शामनगर तलाव येथे होणार आहे.

Loading Comments