Advertisement

थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

राज्य सरकारतर्फे जयंती, पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याच्या राष्ट्र पुरूष, थोर व्यक्तींच्या यादीत प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही आता समावेश करण्यात आला आहे.

थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
SHARES

राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे. पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

राज्य सरकारतर्फे जयंती, पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याच्या राष्ट्र पुरूष, थोर व्यक्तींच्या यादीत प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही आता समावेश करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने या यादीत बदल केल्याने आता अशा दिवसांची यादी ३७ वरून ४१ झाली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर २०२१ वर्षासाठीची ही यादी १५ डिसेंबर २०२० रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये ३७ दिवसांचा समावेश होता. या यादीतील व्यक्तींच्या जयंती, पुण्यातिथी निमित्त त्यांना अभिवादन करणे, इतर दिवस त्या सूचनाप्रमाणे साजरे करणे, अशा सूचना सर्व सरकारी कार्यालयांना देण्यात आल्या होत्या.

आता १४ जानेवारी २०२१ रोजी यासंबंधीची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये चार नवीन नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, १६ फेब्रुवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, १७ सप्टेंबरला केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि २७ डिसेंबरला डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम समाविष्ठ करण्यात आला आहे.



हेही वाचा -

"सीरमसाठी भावनिक क्षण", पुनावाला यांनी शेअर केला टीमसोबत फोटो

‘फिल्मी स्टाईल’ने आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा