Advertisement

'अवनी'च्या चौकशी समितीवर निवृत्त न्यायधीश बसवा - उद्धव ठाकरे

अवनी वाघिणीच्या शिकार करण्यात आल्यानंतर ही शिकार नियमानुसार केली गेली की नाही? यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ज्या लोकांना अवनीच्या हत्येची सुपारी दिली त्यांनाच या समितीवर नेमण्यात आलं आहे. त्यांच्या ऐवजी निवृत्त न्यायाधीशांना या समितीवर नेमून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

'अवनी'च्या चौकशी समितीवर निवृत्त न्यायधीश बसवा - उद्धव ठाकरे
SHARES

अवनी वाघिणीच्या शिकारीवरून राजकारण तापत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा या शिकारीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. अवनी वाघिणीच्या शिकारीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीवर निवृत्त न्यायधीश बसवण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.


शिकार नियमानुसार?

अवनी वाघिणीच्या शिकार करण्यात आल्यानंतर ही शिकार नियमानुसार केली गेली की नाही? यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ज्या लोकांना अवनीच्या हत्येची सुपारी दिली त्यांनाच या समितीवर नेमण्यात आलं आहे. त्यांच्या ऐवजी निवृत्त न्यायाधीशांना या समितीवर नेमून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सुधीर मुनगंटीवार यांनी काही वाघिणीला गोळ्या घातल्या नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांची पाठराखण केली, मग सर्जिकल स्ट्राईक काय मोदींनी केलं होतं? या चौकशी समितीला काहीही अर्थ नसल्याचा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.


दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या छायेत असून मराठवाडा विदर्भ या भागातील शेतकऱ्यांची दुष्काळामुळं बिकट अवस्था झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी कुटुंबाला दुष्काळाच्या झळा सोसव्या लागत आहेत. या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं ५ हजार कुटुंबांना शिवसेनेनं मदतीचा हात दिला आहे.

अमरावती, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, अकोला, हिंगोली, जालना, बीड , लातूर, वाशीम, नांदेड, उस्मानाबाद, यवतमाळ, यांसारख्या विविध ठिकाणच्या शेतकरी कुटुंबाना १५ किलो गहू व तांदूळ, ५ लिटर गोडेतेल, ५ किलो साखर, ३ किलो डाळ, २ किलो रवा आणि मैदा, ३ किलो डालडा या गृहपयोगी वस्तू पाठवण्यात आल्या.



हेही वाचा-

मुनगंटीवार ठोकणार निरूपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

अधिवेशनात गाजणार अवनी वाघिणीचा मुद्दा; शिवसेना आक्रमक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा