Advertisement

सेनेनं भाजपाला पुन्हा दूर सारलं!

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या वेळा न जुळल्यानं सोमवारची होणारी ही भेट दोन दिवस पुढं ढकलण्यात आल्याची माहिती मुनगंटीवारांनी प्रसारमाध्यमांना दिली.

सेनेनं भाजपाला पुन्हा दूर सारलं!
SHARES

''आता मुका घेतला तरी युती होणार नाही'', असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या युतीच्या दाव्यातील हवा काढून घेतल्यानंतही भाजपाकडून शिवसेनेचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळेच सोमवारची सकाळ झाली ती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या बातम्यांनी. परंतु उद्धव यांनी ही भेट घेण्यास नकार दिल्याने पुन्हा तर्कवितर्कांना उत आला आहे.


वेळ देण्यास नकार?

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या वेळा न जुळल्यानं सोमवारची होणारी ही भेट दोन दिवस पुढं ढकलण्यात आल्याची माहिती मुनगंटीवारांनी प्रसारमाध्यमांना दिली. प्रत्यक्षात मात्र उद्धव यांनी भेटीसाठी वेळ देण्यास नकार दिल्याची चर्चा आहे.


नाणारवरून कोंडी वाढली

नाणार प्रकल्पाचा मुद्दा सध्या गाजत असून कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे. तर विरोधकांकडूनही होणारी कोंडी वाढलेली असतानाच युतीत फाटाफूट झाली आहे.


पुन्हा प्रयत्न करणार

याच सर्व विषयांवर चर्चा करत युतीसाठी शिवसेनेचं मन वळवण्याची जबाबदारी मुनगंटीवर यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यानुसारही ही भेट होणार होती, पण उद्धव यांनी भेटीस नकार दिल्यानं आता मुनगंटीवार २ दिवसानंतर पुन्हा भेटीसाठी प्रयत्न करणार असल्याचं समजतं आहे.




हेही वाचा-

आमच्या टेकूवर सरकार उभं- संजय राऊत

युतीत पुन्हा मिठाचा खडा

युतीच्या चर्चेची जबाबदारी मुनगंटीवारांवर?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा