Advertisement

ही फक्त सदिच्छा भेट - शिवसेना


ही फक्त सदिच्छा भेट - शिवसेना
SHARES

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. तेव्हापासून राजकीय वर्तुळात ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर ही बहुचर्चित भेट पार पडली. यावेळी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही. 


IMG-20171102-WA0117.jpg

ही तर फक्त सदिच्छा भेट

राज्यात सत्तेत आल्यापासून शिवसेनेने भाजपावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यानंतरच्या काळात मुंबईसह राज्यातील पालिका निवडणुकांवेळी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या काळात एकमेकांवर पातळी सोडून टीका केल्यामुळे दोन्ही पक्षांमधील दरी आणखीनच वाढली. याशिवाय, शिवसेना नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्द्यांवरून सातत्याने पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला स्थान देण्यात आले नव्हते. उद्धव यांनी एका कार्यक्रमात कोणत्याही क्षणी निवडणुकांसाठी तयार राहा, असे आदेश पक्षाच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिले होते. दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावर ममता बॅनर्जी या कडव्या भाजपाविरोधक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे साहजिकच आजच्या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली होती. 

मात्र, शिवसेनेकडून तुर्तास तरी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा