Advertisement

नाणारवरून नाराजी, करार केलात तर भेट कशाला?-उद्धव


नाणारवरून नाराजी, करार केलात तर भेट कशाला?-उद्धव
SHARES

नाणार प्रकल्पाला असलेला विरोध शिवसेनेने मागे घ्यावा यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. मात्र, उद्धव यांनी ही भेट घेण्यास नकार देत पेट्रोलियम मंत्र्यांना नाराजी कळवली. एवढंच नाही, तर नाणार प्रकल्पाबाबत कोणताही करार होऊ देणार नाही, असा पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतला.


भेट कशासाठी ?

करारावर सह्या झाल्या अाहेत, मग मग भेट कशासाठी घ्यायची, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भेटीचा प्रस्ताव फेटाळल्याचं समजतं. नाणार प्रकल्पासाठी शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उद्धव ठाकरे यांना अापण भेटण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडं भेटीची वेळही मागितली होती.


शिवसेना आक्रमक

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उद्योगपतींची बैठक राजभवनात झाली. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना डावलण्यात आलं होतं. यामुळे शिवसेना अाता आक्रमक झाली  अाहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही नाणारचे पडसाद उमटले होते. बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत अापला निषेध नोंदवला.



हेही वाचा - 

नाणार प्रकल्पावरून शिवसेनेचा मंत्रीमंडळ बैठकीत निषेध

मराठा आरक्षणावर निर्णय कधी घेणार?- उच्च न्यायालय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा