Advertisement

युतीच्या चर्चेत रस नाही - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे बीड आणि जालना जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. दुष्काळाची पाहणी करत ते शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांचे प्रश्न समजावून घेत आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर आणि त्यांच्या योजनांवर जोरदार टिका केली आहे.

युतीच्या चर्चेत रस नाही - उद्धव ठाकरे
SHARES

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं जुळलं असून आता तमाम महाराष्ट्राचं लक्ष भाजपा-शिवसेना युतीकडं लागलं आहे.  युतीचा पोपट मेला असं नुकतचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत वक्तव्य करत युती होणार नाही हे स्पष्ट केलं होतं. तर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चेतही आपल्याला रस नसल्याचं म्हणत भाजपाला दणका दिला आहे. 


फसाल योजना 

उद्धव ठाकरे बीड आणि जालना जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. दुष्काळाची पाहणी करत ते शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांचे प्रश्न समजावून घेत आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर आणि त्यांच्या योजनांवर जोरदार टिका केली आहे. सरकारकडून केली जाणारी दुष्काळाची पाहणी हे केवळ गाजर असून फसल योजना ही फसाल योजना आहे. तर पीक विमा योजनेतेही भ्रष्टाचार झाल्याचं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतीमधलं आपल्याला काही कळतं नसेल पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसतं. तर दुष्काळ गंभीर असला तरी शिवसेना खंबीर असल्याचं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूनं शिवसेना नेहमीच असेल असा विश्वासही यावेळी दिला.


भाजपाची भूमिका काय?

दरम्यान, शिवसेनेकडून युती होणार नसल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, दुसरीकडं भाजपा युतीसाठी अजूनही प्रयत्न करत आहे. त्यामुळे युतीकडे नाही म्हटलं तरी सर्वांचचं लक्ष लागलं आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बीडमध्ये युती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी सरकार गंभीर नसल्याचं म्हटलं आहे. तर युतीच्या चर्चेत रस नसल्याचं वक्तव्य त्यांनी केल्यानं यापुढं आता भाजपाची भूमिका काय असेल हे महत्त्वाचं ठरेल.



हेही वाचा - 

२४ तासातच पंकजा मुंडे 'पण' विसरल्या, धनगर आमदाराने करून दिली आठवण

अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच 'पटकवले’, विसरलात का? -संजय राऊत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा