Advertisement

अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच 'पटकवले’, विसरलात का? -संजय राऊत

राऊत यांनी ट्वीटवरून शाह यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तर प्रसारमाध्यमांच्या मुलाखतीतून भाजपावर तिखट आणि बोचऱ्या शब्दात टिका केली आहे. शिवसेना पोकळ धमक्या आणि पादऱ्या पावट्यांच्या इशाऱ्यांना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचं काळीज वाघाचं आहे. महाराष्ट्र गांडुंची अवलाद नाही हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे असं म्हणत राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच 'पटकवले’, विसरलात का? -संजय राऊत
SHARES

युती होगी तो साथी को जितायेंगे नही तो पटक देंगे, असं म्हणत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला डिवचलं आहे, धमकावलं आहे. शाह यांच्या या धमकीवजा इशाऱ्याला आता शिवसेनेनंही सडेतोड उत्तर दिलं आहे. अफझल खान आणि औरंगजेबास आम्हीच 'पटकवले' आहे. इतक्या लवकर विसरलात का? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शाह यांना प्रत्युत्तर दिलं आहे.


...तर शिंगावर घेऊ 

 निवडणुका तोंडावर आल्या असतानाही भाजपा-शिवसेना युतीचं अद्याप काहीच ठरलेलं नाही. युतीसाठी भाजपाकडून शिवसेनेला गोंजरण्याचा प्रसंगी सावधपणे धमकावण्याचाही प्रयत्न झाला. पण शिवसेना मात्र भाजपाला दूरच ठेवत आहे. त्यामुळे आता भाजपाकडूनही स्वबळाची भाषा होऊ लागली असून शिवसेनेला आता थेट धमकावत डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लातुरच्या संकल्प सभेत याचाच अनुभव आला. मित्रपक्ष सोबत आला तर ठीक अन्यथा विरोधकांना जसं उखडून लावलं (अर्थात हिंदीत पटकले ) तसं त्यांनाही उखडून फेकू असं वक्तव्य लातुरच्या संकल्प सभेत शाह यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना चांगलीच तापली असून शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे. कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ अशी रोखठोक भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. 


सडेतोड उत्तर

राऊत यांनी ट्वीटवरून शाह यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तर प्रसारमाध्यमांच्या मुलाखतीतून भाजपावर तिखट आणि बोचऱ्या शब्दात टिका केली आहे. शिवसेना पोकळ धमक्या आणि पादऱ्या पावट्यांच्या इशाऱ्यांना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचं काळीज वाघाचं आहे. महाराष्ट्र गांडुंची अवलाद नाही हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे असं म्हणत राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. तर पटकवण्याची भाषा करणाऱ्यांनाच पटकवण्याचा इशाराही राऊत यांनी दिला आहे. अफझल खान आणि औरंगजेबास आम्हीच पटकवले आहे. इतक्या लवकर विसरलात का असं ही त्यांना आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


भाजप रोडरोमियो

एकीकडे आम्हाला पटकावण्याची भाषा करता आणि दुसरीकडे आमच्याच मागं का लागता? कितीदा नाही म्हटलं तर पुन्हा पुन्हा मागं लागत प्रेमात पडा, आमच्याशी लग्न करा असं का म्हणताय, रोडरोमियोसारखं आमच्या मागं लागलेत. असं रोडरोमियोसारखं मागं लागणं कायद्यानं गुन्हा अाहे असा बोचऱ्या शब्दातही राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. 



हेही वाचा - 

आरक्षण टिकवणं ही आता सरकारची जबाबदारी - मराठा क्रांती मोर्चा

एकनाथ शिंदेंकडं आरोग्य खात्याचा अतिरिक्त पदभार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा