Advertisement

अर्थव्यवस्थेला नायटा झालाय, शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

'देशाची अर्थव्यवस्था आजारी आहे, पण मोदी सरकार ते मानायलाच तयार नाही. आजार लपवल्यामुळं अर्थव्यवस्थेला नायटा झाला आहे,' अशा शब्दांत देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दल ​शिवसेनेने​​​ केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

अर्थव्यवस्थेला नायटा झालाय, शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका
SHARES

'देशाची अर्थव्यवस्था आजारी आहे, पण मोदी सरकार ते मानायलाच तयार नाही. आजार लपवल्यामुळं अर्थव्यवस्थेला नायटा झाला आहे,' अशा शब्दांत देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दल शिवसेनेने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 

सामनातील अग्रलेखातून सरकारच्या धोरणांवर शिवसेनेने चांगलीच टीका केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे, त्यासाठी आता पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांनाही जबाबदार धरता येणार नाही, अशी सरकारची अवस्था आहे. पंडित नेहरू व त्यांच्या सहकाऱ्यांनी जे कमावले ते विकून खाण्यातच सध्या धन्यता मानली जात आहे.

हेही वाचा- शिवसेनेची भाजपला साथ, केलं नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान

अर्थकारणात कसलंही योगदान नसलेल्या निर्मला सीतारामन देशाच्या अर्थमंत्री आहेत. तज्ज्ञांचं ऐकून घेतलं जात नाही. सरकारच्या दृष्टीनं अर्थव्यवस्था म्हणजे शेअर बाजारातील 'सट्टा' झाला आहे.

राज्यकर्त्यांना अर्थमंत्री, रिझर्व्ह बँक गव्हर्नर, अर्थ सचिव, नीती आयोगाचे अध्यक्ष हे सगळे आपल्या मुठीत राहणारे हवे आहेत व हेच आजाराचे मूळ आहे. अर्थव्यवस्था तळमळताना आणि तडफडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत 'जय जय रघुराम समर्थ' म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय देखील नाही.

हेही वाचा- मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा, चंद्रकांत पाटील यांचा दावा

असं म्हणत शिवसेनेने अप्रत्यक्षपणे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या एकाधिकारशाहीमुळं अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचं मत राजन यांनी नुकतंच व्यक्त केलं होतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा