Advertisement

शिवसेनेची भाजपला साथ, केलं नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भलेही नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर टीका करण्यात आली असली, तरी सोमवारी ​शिवसेनेच्या खासदारांनी​​​ या विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेनेची भाजपला साथ, केलं नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान
SHARES

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भलेही नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर टीका करण्यात आली असली, तरी सोमवारी शिवसेनेच्या खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याचं पाहायला मिळालं. या विधेयकाच्या बाजूने २९३ तर विरोधात ८२ मतं पडली. त्यानंतर हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं.

हेही वाचा- ठाकरे सरकारचं मोठं पाऊल, ३ हजार मराठा तरूणांना मिळणार दिलासा

हिंदूंना जगाच्या पाठीवर हिंदुस्थानशिवाय दुसरा देश नाही हे मान्य, पण नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ‘व्होट बँके’चं नवं राजकारण यातून कोणी घडवू पाहत असेल तर ते देशाच्या हिताचे नाही, अशा शब्दांत शिवसेनेकडून या विधेयकावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे या विधेयकावर मतदान होत असताना शिवसेनेचे खासदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्याआधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक देखील घेतली होती. 

हेही वाचा- पंकजा मुंडे अजूनही नाराज? भाजपच्या बैठकीला गैरहजर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत मांडलं. या विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधकांनी एकच गदारोळ केला. हे विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी मतदान घेण्यात आलं. त्याला २९३ खासदारांनी पाठिंबा दिला तर विधेयकाच्या विरोधात ८२ मतं पडली. शिवसेनेचे एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच भाजपच्या बाजूने मतदान केलं. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा