निवडणूक खर्चाची मर्यादा ‘इतक्या’ लाखांपर्यंत वाढवा, शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मागणी

विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक उमेदवाराला घालून देण्यात आलेली २८ लाख रुपयांच्या प्रचार खर्चाची मर्यादा वाढवून ७० लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

SHARE

विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक उमेदवाराला घालून देण्यात आलेली २८ लाख रुपयांच्या प्रचार खर्चाची मर्यादा वाढवून ७० लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिवसेनेच्या मागणीला भाजपा आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या बेसुमार वापराला लगाम घालण्यासाठी निवडणूक आयोगाने ही मर्यादा घातली आहे.

निवडणूक आयुक्त मुंबईच्या दौऱ्यावर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा तसंच सुशील चंद्रासहीत काही अधिकारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील निवडणुकीच्या तयारीची पाहणी करत आहेत. राज्यात आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.  

निष्पक्ष निवडणूक होणार

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांनी  निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली  आणि निवडणूक खर्चाची मर्यादा २८ लाखांवरून ७० लाखांवर आणण्याची मागणी केलं. या मागणीवर निवडणूक आयोगाने नेमकी काय प्रतिक्रिया दिली हे मात्र कळू शकलेलं नाही. तरी ईव्हीएमद्वारे निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यात येतील, हे आश्वासन निवडणूक आयोगाने दिल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.     हेही वाचा-

शिवसेनेकडून १० आमदारांना डच्चू? यादीत कुणाची नावे?

केंद्रीय निवडणूक आयुक्त मुंबईत, विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावासंबंधित विषय
ताज्या बातम्या