मोदींच्या फोटोवरून शिवसेना आक्रमक

 Mumbai
मोदींच्या फोटोवरून शिवसेना आक्रमक
Mumbai  -  

मुंबई - खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडरवर महात्मा गांधी यांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो लावल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या फोटोनंतर भाजपावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होऊ लागली आहे. एक व्यक्ती म्हणून स्वत:वर प्रेम केल्यावर काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. महात्मा गांधी यांच्या फोटोची जागा नरेंद्र मोदी कसे घेऊ शकतात असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच फिल्मफेअर पुरस्कारामध्ये पाकिस्तानी कलाकारांनाही नामांकन दिल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. 'फिल्मी जगतातील काही लोक इतके मूर्ख आहेत की, देशात काय सुरू आहे हे त्यांना माहित नाही. पाकिस्तानी कलाकारांना सन्मानित करून काय मिळणार असा सवाल करत देशाच्या अस्मितेच्या विरोधात असणाऱ्या लोकांविरोधात फक्त शिवसेनेने नाहीतर सर्व लोकांनी विरोध करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Loading Comments