शिवसेना-भाजपमध्ये तू-तू, मै-मै

  मुंबई  -  

  मुंबई - शिवसेना आणि भाजपमधला कलगितुरा काही शमण्याचं नावच घेत नाहिये. एकमेकांना बोलण्याची कुठलीच संधी दोन्ही पक्ष सोडत नाहीत. सोमवारी आशीष शेलार यांनी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली. यावरून दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा वाद रंगलाय. मंगळवारी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आशीष शेलार यांना प्रत्युत्तर दिलंय.

  ‘मुंबईच्या विकासासाठी उध्दव ठाकरे यांनी काही स्वप्न बघितली. त्यानुसार काम होणं गरजेचं आहे. याचे श्रेय उद्धव ठाकरे यांना देऊन मोठेपणा दाखवण्याची गरज आहे. कोस्टल रोड मुंबईच्या पूर्व भागासाठी जरुरीचा आहे. मात्र मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर इमारती बनवण्याचं धोरण असेल तर बिल्डरांच्या घशात जमीन जाणार की काय? अशी भिती नक्की निर्माण होणाराय. अशा प्रकारे विकास झाल्यानंतर त्यांना सुविधा पुरवण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी ट्वीट करून बिल्डरांच्या घशात जमीन जाईल अशी भीती व्यक्त केलीय. त्याबद्दलची शंका दूर करावी’, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.