किरीट सोमय्यांनी केले गंभीर आरोप

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - मुंबई पालिका निवडणूक ऐन रंगात आली आहे. भाजपा आणि शिवसेना नेते एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता थेट भाजपाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांवर आरोप होत आहेत त्यामुळे निवडणूकीला चागंलीच रंगत आली आहे.

दरम्यान, मनी लाँडरिंगप्रकरणी जेलमध्ये असेलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केल्याचा गंभीर आरोप भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी गुरूवारी केला आहे. जर उद्धव ठाकरेंनी आपली संपत्ती घोषित केली तर हे सगळं बिंग फुटेल याची भीती ठाकरेंना असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं आहे. ‘उद्धव ठाकरे स्वत:ची संपत्ती का जाहीर करत नाही? त्यांना एवढी कसली भीती वाटते?’ असं म्हणत सोमय्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘भुजबळ यांनी ज्या कंपन्यामधून मनी लाँडरिंग केलं. त्याच कंपन्यांमधून उद्धव ठाकरेंच्या सीएनेसुद्धा मनी लाँडरिंग केलं आहे. इतकंच नाही तर शिवेसेनेच्या नेत्यांनीही या कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केलं आहे. या सगळ्या आरोपांना उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकतील का?’ असे आरोप सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर करत सोमय्यांनी मोबाईल द्वारे क्लिप प्रसिद्ध केली.

दरम्यान, याआधीही किरीट सोमय्यांनी सात कंपन्यांची यादी जाहीर केली होती. या कंपन्यांशी उद्धव ठाकरेंचे लागेबांधे असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली संपत्ती जाहीर करावी, असं आव्हान सोमय्यांनी दिलं होतं.

Loading Comments