Advertisement

आदित्य ठाकरेंसाठी ग्रामीण भागातील मतदारसंघाची चाचपणी?

येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.

आदित्य ठाकरेंसाठी ग्रामीण भागातील मतदारसंघाची चाचपणी?
SHARES

येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. अशातच शिवसेनेकडून आदित्य यांच्यासाठी ग्रामीण भागातील सुरक्षीत मतदारसंघाचा देखील शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.   

सुरक्षित जागेचा शोध

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच एखादी व्यक्ती थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. त्यामुळे आदित्य यांचं विधानसभेतील पदार्पण सुरक्षीतरित्या व्हावं म्हणून शिवसेनेकडून त्यांच्यासाठी अत्यंत भरवशाच्या जागेची चाचपणी करण्यात येत आहे. त्यानुसार मुंबईतल्या वरळी मतदारसंघासोबतच ग्रामीण भागातील मतदारसंघही धुंडाळले जात आहेत. 

हेही वाचा- तयारी राज्यरोहणाची!

ग्रामीण मतदारांवर लक्ष

आदित्य यांनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवल्यास ग्रामीण भागातील मतंही शिवसेनेकडं आकर्षित होऊ शकतील. तर शहरी पक्ष अशी जुनी ओळख देखील पुसता येईल, असं पक्ष नेतृत्वाला वाटत आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आदित्य यांनी दिग्रस आणि मालेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा देखील आग्रह धरला आहे. 

आदित्य यांनी आॅगस्टमध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू केली होती. या यात्रेच्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरले. त्यांच्या यात्रेला आणि सभांना ग्रामीण भागातील तरूणांसोबत वयस्कर मतदारांनीही चांगला प्रतिसाद दिला.



हेही वाचा- 

Video: ‘आरे’ला हात लावू नका, आदित्य ठाकरेंनी सरकारला दिला इशारा

'आदित्य संवाद', 'जन आशीर्वाद यात्रा' यानंतर शिवसेनेचा 'हा' नवा उपक्रम



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा