Advertisement

शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्रातून मदत घेण्याची शिवसेनेची मागणी


शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्रातून मदत घेण्याची शिवसेनेची मागणी
SHARES

मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थीनी भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. ‘जोवर कर्जमुक्तीबाबत निर्णय होत नाही तोवर सभागृहाचं कामकाज पुढं जाणार नाही.’ असं   शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं.

शिवसेनेच्या या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी, ‘आपल्याला कर्जमुक्तीसाठी केंद्राची गरज लागणार आहे असं सांगितले.’ दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नरेंद्र मोदींची भेट घ्यावी आणि त्यांचाशी चर्चा करुन याबाबत निवेदन करावं अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली.


दरम्यान ‘मुख्यमंत्र्यांनी निवेदन करुन सरकारची भूमिका स्पष्ट करावी. निवेदन केल्यानंतर सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होईल. अशी भूमिका आम्ही घेतल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या किंवा परवा नरेंद्र मोदींनी भेटणार असल्याची माहिती रावतेंनी यावेळी दिली. या बैठकीआधी शिवसेनेच्या मंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत कर्जमाफीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदम, सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. सभागृहाचे कामकाज चालावे आणि शेतकऱ्यांचा प्रश्नदेखील सुटावा अशी भूमिका शिवसेनेची असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा