शिवसेना कौरवसेना - आशिष शेलार

  Mumbai
  शिवसेना कौरवसेना - आशिष शेलार
  मुंबई  -  

  मुंबई - महाभारत हे अहंकारामुळे घडले होते आणि युती ही सुद्धा अहंकारामुळे तुटली. जो अहंकाराची भाषा करतो त्याचा पराभव अटळ आहे. त्यामुळे अहंकाररूपी कौरवांचा पराभव करून सत्याचा विजय मिळवण्यासाठी सज्ज व्हा असे सांगत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला कौरव सेना संबोधले. गोरेगाव येथील विजय संकल्प मेळाव्यात बोलताना त्यांनी, हम किसीको छेडेंगे नहीं, और किसीने छेडा तो छोडेंगे नहीं, अशी भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला, पण त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवछत्रपतींचे स्मारक यांचा समावेश या वचननाम्यात नाही. त्यामुळे या दोन्ही स्मारकाचा समावेश भाजपाच्या वचनानाम्यात केला जाणार आहे. या दोन्ही स्मारकांना विरोध करणाऱ्या पक्षासोबत छुपी युती करण्याचे वचनाम्यात नव्हते असा टोला आशिष शेलार यांनी मनसेचे नाव न घेता लगावला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.