उर्दू शाळांतील मुलांना वाटणार टॅब

 Pali Hill
उर्दू शाळांतील मुलांना वाटणार टॅब

मुंबई - विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनेनं टॅबची योजना आखली आहे. हाच धागा पकडत माजी नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर हे प्रभाग क्रमांक 87 येथील मौलाना आझाद उर्दू शाळेतील आठवीतील विद्यार्थ्यांना शनिवारी टॅबचे वाटप करणार आहेत. यासाठी त्यांनी 67 टॅब देखील खरेदी केले आहेत. याआधी त्यांनी खासगी शाळांमध्ये इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेतील टॅबचे वाटप केले होते. विश्वनाथ म्हाडेश्वर प्रभाग क्रमांक 87 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत त्याच पार्श्वभूमीवर ते मतदारसंघात विविध कार्यक्रम घेताना पाहायला मिळत आहेत.

Loading Comments