Advertisement

माझं नाव गद्दारांच्या यादीत नाही, गुलाबराव पाटलांनी राणे पितापुत्रांना सुनावलं

आधी आपली औकात व निष्ठा कुठे आहे ती ओळखा, मगच माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर टीका करा, असा पलटवार शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केला.

माझं नाव गद्दारांच्या यादीत नाही, गुलाबराव पाटलांनी राणे पितापुत्रांना सुनावलं
SHARES

मी गेली ३६ वर्षे शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. गद्दारांच्या यादीत माझं नाव नाही. तुम्ही तर भगवा सोडून पळाले. आधी काँग्रेसमध्ये आणि आता भाजपमध्ये गेले. आधी आपली औकात व निष्ठा कुठे आहे ती ओळखा, मगच माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर टीका करा, असा पलटवार शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केला. (shiv sena mla gulabrao patil slams narayan rane and nilesh rane)

सुपारी चोर गुलाबराव पाटील मंत्री असून ह्याला कुत्रा विचारत नाही... क्वार्टर चे पैसे आमच्याकडून घेऊन जायचा हा... आता मंत्री झालाय म्हणून बाटलीपर्यंत पोचला आणि क्वॉटरचे दिवस विसरला, अशी टीका भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली होती. त्याला गुलाबराव पाटील यांनीही तितक्याच जोरदारपणे उत्तर दिलं आहे. 

नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, नारायण राणे ज्यावेळेस शिवसेनेत हाेते, त्यावेळी आम्ही त्यांचे पाठिराखे होतो. हे त्यांचं पोट्टं अंडरपँडमध्येसुद्धा नसेल, त्यामुळे त्यांनी मला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेत ३६ वर्षे घातलेला कार्यकर्ता आहे मी. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी, अशा धमक्या आमच्यासारख्याला देऊ नयेत. गुलाबराव पाटील किती शुद्धीत असतात, अशी टीका माझ्यावर केली, मी त्यांना सांगू इच्छितो की मी भगव्याच्या धुंदीत आहे. तुम्ही तर तो भगवाही सोडून पळालेत. काँग्रेसमध्ये गेले आणि भाजपमध्ये आले. मी निष्ठावंत आहे. गद्दाराच्या यादीत माझं नाव नाही. त्यामुळे आधी आपली औकात आणि निष्ठा ओळखावी आणि नंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर टीका करावी, असं गुलाबराव पाटील यांनी सुनावलं आहे.

हेही वाचा - Narayan Rane: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मातोश्रीपुरताच- नारायण राणे

ज्यावेळेस मी त्यांच्या वडिलांच्या मागे उभा होतो, त्यावेळेस ते फायटर बटालियनमध्ये माझं नाव घ्यायचे, आता मी कसं काय त्यांना वाईट वाटायला लागलो? शेवटी हे फस्ट्रेट झालेली लोकं आहेत, त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करणार? असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. परंतु घरात बसलेला मुख्यमंत्री देशातील अव्वल ५ जणांमध्ये येतो, ते बाहेर पडले असते तर काय परिस्थिती असती. कोविड नसता तर देशात पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री असते. त्यामुळेच त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु ते निस्वार्थीपणे लोकांची सेवा करत असून लोकांच्या मनात त्यांनी स्थान मिळवलेलं आहे. त्यामुळे त्यांची कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तरी ती होऊ शकत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

ज्या नारायण राणेंना ठाकरे कुटुंबाने उभं केलं. त्यांचं नाव तयार केलं. त्यांच्या कुटुंबावर तरी त्यांनी असे घाणेरडे आरोप करायला नको होते. माणूस कुठल्या विचारांत गेला, यापेक्षा तो कुणामुळे मोठा झाला हे पाहायला पाहिजे होतं. पण ज्यांना मनाची नसते, त्यांना जनाची काय असणार?  असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी राणे पितापुत्रांना टोला हाणला आहे.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा