Advertisement

Ram Mandir: पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? निलेश राणे यांचा सवाल

पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? मंदिर हा हिंदूंचा श्रद्धेचा विषय आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला त्रास होण्यासारखं काय? असा प्रश्न निलेश राणे यांनी पवारांना विचारला आहे.

Ram Mandir: पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? निलेश राणे यांचा सवाल
SHARES

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाबाबत केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? मंदिर हा हिंदूंचा श्रद्धेचा विषय आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला त्रास होण्यासारखं काय? असा प्रश्न निलेश राणे यांनी पवारांना विचारला आहे. (bjp leader nilesh rane slams ncp chief sharad pawar over ayodhya ram mandir comment)

काय म्हणाले राणे?

आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करताना निलेश राणे म्हणाले की, पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता??? मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात NCP ला त्रास होण्यासारखं काय??? राज्यातील १३०० डॉक्टर आंदोलन करणार आहेत. नोकरीत कायम न केल्यामुळे डॉक्टरांची नाराजी आहे. राम मंदिरचा विषय काढून हिंदूंना डिवचण्यापेक्षा पवार साहेबांनी राज्य सरकारवर लक्ष द्यावं. राज्य सरकारने अगोदरपासून गंभीरतेने घेतलं असतं तर महाराष्ट्र ह्या संकटात देशामध्ये १ नंबर नसता.

हेही वाचा - "राम मंदिर होईल, तेव्हाच कोरोना जाईल.."!

उमा भारतींचा टोला

त्याआधी शरद पवार यांनी केलेलं हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारं नाही, तर प्रभू रामचंद्रांना विरोध करणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २ तासांसाठी जर अयोध्येला गेले, तर अशी कुठली अर्थव्यवस्था कोसळेल? पंतप्रधान मोदी असे व्यक्ती आहेत, जे ४ तासांपेक्षा जास्त वेळ झोपत नाहीत आणि २४ तास काम करतात. आजपर्यंत त्यांनी कधीही सुट्टी घेतलेली नाही. ते विमान प्रवासात देखील कामच करतात. मला त्यांचा स्वभाव ठाऊक आहे. प्रभू रामचंद्रांना त्यांनी २ तास दिले, तर काय होणार आहे? असा प्रश्न भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी पवारांना विचारला होता.

जेव्हा अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, त्याच दिवशी कोरोना जाईल, असं मोदी सरकारला वाटत आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत देखील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा घाट घातला जातोय. सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. परंतु आमच्यासाठी तर कोरोना संकटाशी मुकाबला करणंच महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या प्रस्तावित भूमिपूजन कार्यक्रमावर भाष्य केलं होतं. 

पंतप्रधानांच्या हस्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरासाठी कोन शीला बसवण्याचा कार्यक्रम करण्यात येईल. येत्या ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान मोदी या कार्यक्रमासाठी अयोध्येला जातील. पंतप्रधान झाल्यापासून मोदी पहिल्यांदाच अयोध्येला जाणार आहेत. भूमिपूजन कार्यक्रमात श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास ४० किलो वजनाच्या चांदीची शीला समर्पित करतील.

हेही वाचा - Ram Mandir: हा तर प्रभू रामचंद्रांनाच विरोध, उमा भारती पवारांवर भडकल्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा