Advertisement

जरा कमी बोला, डाॅक्टरांचा संजय राऊत यांना सल्ला!

धारदार लेखणी आणि तिखट वाणीने राजकीय विरोधकांना घायाळ करणारे शिवसेना (shiv sena) नेते खासदार संजय राऊत यांना चक्क कमी बोलण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

जरा कमी बोला, डाॅक्टरांचा संजय राऊत यांना सल्ला!
SHARES

धारदार लेखणी आणि तिखट वाणीने राजकीय विरोधकांना घायाळ करणारे शिवसेना (shiv sena) नेते खासदार संजय राऊत यांना चक्क कमी बोलण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. खुद्द संजय राऊत यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मुंबई, वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात नुकतीच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर राऊत यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी संजय राऊत म्हणाले, मागच्या वेळी माझ्यावर एक शस्रक्रिया झाली होती, पण काही गोष्टी राहिल्या होत्या. कोव्हिडमुळे उपचार होऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं सर्व उपचार करून घ्यायला सांगितलं होतं. त्यानुसार रुग्णालयात दाखल झालो होतो. 

हेही वाचा- यासाठीच उद्धव ठाकरेंनी माझी नेमणूक केलीय- संजय राऊत

राजकीय जीवनात वावरत असताना बरीच धावपळ होते, ताण तणाव येतात. व्यस्ततेमुळे स्वत:च्या शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष होतं. त्यातच बेफिकरीपणाने राहण्याची माझी सवय असल्याने त्याचा तब्येतीवर परिणाम झाला. त्यामुळे पुढचे काही दिवस विश्रांती करण्यासोबतच कमी बोलण्याचा आणि कामाचा फार ताण न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. खाण्यापिण्यासोबत काही राजकीय पथ्यही डॉक्टरांनी पाळायला सांगितली आहेत. त्यामुळे यापुढं सर्वच पथ्यपाणी नीट पाळणार आहे. पुन्हा रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये, असाच माझा प्रयत्न राहील. सोमवारपासून 'सामना'च्या कार्यालयात रुजू होईन, अशी माहिती देखील संजय राऊत यांनी दिली. 

गेल्यावर्षी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळून आल्यानंतर संजय राऊत यांच्यावर लीलावतीमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर राऊत यांच्यावर एप्रिल २०२०मध्ये आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यातच वर्षभरानंतर पुन्हा त्रास उद्भवल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या संपूर्ण ताणतणावाच्या प्रक्रियेत संजय राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यातच त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही रुग्णालयातूनच संजय राऊत इतर नेत्यांशी संपर्कात होते. बेडवर बसून सामना वृत्तपत्रासाठी अग्रलेख लिहितानाचा त्यांचा फोटो तर बराच व्हायरल झाला होता.  

(shiv sena mp sanjay raut gets discharged from lilavati hospital after angioplasty)

Read this story in हिंदी
संबंधित विषय