Advertisement

संजय राऊत यांच्यावर होणार ‘ही’ शस्त्रक्रिया

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

संजय राऊत यांच्यावर होणार ‘ही’ शस्त्रक्रिया
SHARES

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. वर्षभरापूर्वी देखील राऊत यांच्यावर  करण्यात आली होती. परंतु त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेल्यावर्षी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळून आल्यानंतर संजय राऊत यांच्यावर लीलावतीमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर राऊत यांच्यावर एप्रिल २०२०मध्ये आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यातच वर्षभरानंतर पुन्हा त्रास उद्भवल्याने ही शस्त्रक्रिया तातडीने करण्यात येणार आहे. 

हेही वाचा- यासाठीच उद्धव ठाकरेंनी माझी नेमणूक केलीय- संजय राऊत

लीलावती रुग्णालयातील डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करणार येईल. या शस्त्रक्रियेसाठी संजय राऊत बुधवारी रुग्णालयात दाखल होणार असून गुरुवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या संपूर्ण ताणतणावाच्या प्रक्रियेत संजय राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यातच त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही रुग्णालयातूनच संजय राऊत इतर नेत्यांशी संपर्कात होते. बेडवर बसून सामना वृत्तपत्रासाठी अग्रलेख लिहितानाचा त्यांचा फोटो तर बराच व्हायरल झाला होता.  

(shiv sena mp sanjay raut admitted to lilavati hospital for angioplasty)

हेही वाचा- सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी ईडीला देईन, मग बघूया कुणाची चौकशी होते- संजय राऊत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा