Advertisement

हे मीठागरवाले कुठून आले? संजय राऊत संतापले

ही जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचं आहे. मग हे मीठागरवाले आले कुठून? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

हे मीठागरवाले कुठून आले? संजय राऊत संतापले
SHARES

मेट्रो कारशेडसाठी ( mumbai metro car shed) राज्य सरकारने निश्चित केलेल्या कांजूरमार्ग येथील जागेच्या हस्तांतरणावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आणली असून संबंधित जागेवर सुरू असलेलं काम थांबवण्याचे आदेश देखील न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावर संताप व्यक्त करताना ही जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचं आहे. मग हे मीठागरवाले आले कुठून? असा सवाल देखील शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

न्यायालयाच्या स्थगिती निर्णयावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, राज्यातील विरोधी पक्षाने मेट्रो कारशेडचा विषय राजकीय केला आहे, न्यायालयाने त्यात पडू नये हेच योग्य आहे. पण हल्ली न्यायालय हल्ली कशातही पडत आहे. खालच्या न्यायालयाला डावलून एका खुनी माणसाला वरचं न्यायालय जामीन देतं. बेकायदा बांधकाम तोडण्यासंदर्भात कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवतात. ज्या गोष्टीत न्यायालयाने पडायला पाहिजे किंवा न्याय दिला पाहिजे अशी असंख्य प्रकरणं देशात पडली आहेत. तिथं लोक तारीख पे तारीख करुन झिजत आहेत. पंजाबमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. न्यायालय आणि केंद्र सरकारने अशा विषयांमध्ये लक्ष घातलं पाहिजे. देशाच्या न्यायव्यलस्थेला आम्ही असं कधी पाहिलं नव्हतं, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- मेट्रो कारशेड: “स्थगितीमुळे जनभावनेचा अनादर”

हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्ययाने देशाच्या विकासाचा विषय आहे. त्यावर न्यायालय अशाप्रकारे निर्णय देत असेल तर दुर्दैवी आहे. याच जमिनीवर आधीचं सरकार पोलीस आणि दुर्बल घटकांसाठी घरं बांधणार होतं. याचाच अर्थ ही जमीन सरकारची आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील मला ठाऊक आहे. कांजूरमार्गच्या (kanjurmarg) जागेवर कोणी राजकारणी बंगले किंवा फार्म हाऊस बांधणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात सरकार भाजपाचं नसल्याने अशा प्रकारचे निर्णय येत आहेत का अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होत आहे. महाराष्ट्रात सरकार आलं नाही याचं दुख: मी समजू शकतो. विकास प्रकल्पांना विरोध करुन लोकांमध्ये रोष निर्माण करायचा. लोकांच्या अडचणीत वाढ करायची. सरकारला बदनाम करायचं. यामुळे केवळ महाराष्ट्राचं नुकसान होत असून जनतेवर आर्थिक भार पडत आहे. अशाप्रकारे केंद्राच्या अखत्यारीतील यंत्रणांना हाताशी धरुन महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राच्या जनतेचा छळ करणं हे फार काळ चालणार नाही. ही लढाई चालूच राहील, असं आव्हान देखील संजय राऊत (sanjay rautयांनी विरोधकांना दिलं. 

(shiv sena mp sanjay raut reaction over bombay high court stay on mumbai metro car shed at kanjurmarg)

हेही वाचा- कारशेडच्या कामातून आम्ही ‘इतके’ पैसे वाचवतोय, आदित्य ठाकरेंनी स्थगितीनंतर दिली प्रतिक्रिया

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा