Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

असे खूप आंडू पांडू येऊन गेलेत, भिडेंच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोना मृत्यूबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भिडेंवर टीका केली आहे.

असे खूप आंडू पांडू येऊन गेलेत, भिडेंच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप
SHARES

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोना मृत्यूबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भिडेंवर टीका केली आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे एक विचारक आहेत, त्यांनी एक मत मांडलं आहे की जे ** असतात, ते कोरोनाने मरतात. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला काय ** समजता काय? आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आम्ही कोण आहोत ते, महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवलाय. आतासुद्धा शिवसेना म्हणून, मराठी माणून, महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. तर, पळता भूई थोडी होईल सगळ्यांची. पण आम्हाला वातावरण बिघडावयचं नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भिडे आणि भाजपवर संताप व्यक्त केला. 

राजकारण आणायचं नाही

आम्हाला यामध्ये राजकारण आणायचं नाही, तुम्ही आणू नका. भाजपचे नेते कालपर्यंत इथले राज्यकर्ते होते. महाराष्ट्रातील जनतेने भाजपचे १०५ आमदार निवडून दिले आहेत. म्हणजे तुम्हाला मत देणारी, निवडून देणारी जनता काय ** आहे काय?  याचं भान त्यांनी ठेवायला हवं. किमान त्यांच्यासाठी तरी त्यांनी केंद्राकडून लस घेऊन यायला हवी. आमचं आम्ही बघून घेऊ. महाराष्ट्र जेवढा आमचा आहे, तेवढा तुमचाही आहे. महाराष्ट्र म्हणजे कोणत्याही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा- कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींबाबत संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

काय म्हणाले होते भिडे?

प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजी भिडे यांनी मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. दारुची दुकानं उघडी. त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला की त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. 

हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काहीही होत नाही. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का? असा प्रतिप्रश्नही संभाजी भिडे यांनी केला होता. 

(shiv sena mp sanjay raut slams sambhaji bhide on his coronavirus statements)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा