Advertisement

मी झोपेतही ‘हे’ बडबडायचो..., राऊत यांनी सांगितला मजेशीर अनुभव

कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे, या निर्धाराने पूर्ण झपाटून गेल्यामुळे मी झोपेतही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असं बडबडायचो, असा खुलासा केला खुद्द शिवसेना नेते खासदार ​संजय राऊत​​​ यांनी.

मी झोपेतही ‘हे’ बडबडायचो..., राऊत यांनी सांगितला मजेशीर अनुभव
SHARES

कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे, या निर्धाराने पूर्ण झपाटून गेल्यामुळे मी झोपेतही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असं बडबडायचो, असा खुलासा केला खुद्द शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी. संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातील खासदारांसाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी नुकतंच स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं.

या स्नेहभोजनाला शिवसेनेच्या खासदारांसोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारही आवर्जून उपस्थित होते. यावेळी रंगलेल्या गप्पांच्या मैफिलीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत मोलाचा वाटा उचलणाऱ्या राऊत यांनी आपला अनुभव सांगितला.  

हेही वाचा- संजय राऊत यांची सुरक्षा वाढवली; 'ह्या' वक्तव्यामुळे जीवाला धोका

'महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष एखाद्या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाला शोभेल असाच होता. आताच्या घडीला काय होईल, दुपारी काय होईल आणि संध्याकाळी काय होईल याचा काहीच नेम नसायचा. सलग ३०-३२ दिवस असंच अनिश्चिततेचं वातावरण होतं. आपल्याकडून काही चूक तर होत नाही ना, असं वाटत होतं. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवला. एक वेळ अशी होती की शरद पवार शिवसेनेला टोपी लावतील की काय, अशीही शक्यता लोकं वर्तवायला लागले. पण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. मी स्वप्नातही बडबडायचो की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. माझी मुलं मला म्हणायची बाबा तुम्हाला वेड लागलंय का? पण हा विश्वास मी खरा करून दाखवला. याचचं मला समाधान आहे,' असं राऊत म्हणाले. 

हेही वाचा- अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास विरोध नाही, भुजबळांनी केला खुलासा

सत्तानाट्य संपेल की काय अशी चिन्हे असताना अचानक पहाटे भाजपचं सरकार स्थापन झालं. याबद्दल त्यांनी सांगितलं की, ' सगळी मी आंघोळ करून बसलोच होतो. तेवढ्यात कुणीतरी अजित पवारांनी शपथ घेतल्याचं मला सांगितलं. सुरुवातीला मला विश्वास बसला नाही. पण टीव्ही लावल्यावर चित्र समोर आलं. अशाही स्थितीत शरद पवार ही स्थिती नियंत्रणात आणतील, असं मला वाटत होतं. फडणवीसांना घरी बसवायचं हा त्यांचा शब्द होता, तो त्यांनी खरा करून दाखवला.'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा