Advertisement

समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध नव्हताच- सुनील प्रभू

सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच शिवसेनेच्या आमदारांनी विधीमंडळात मुख्यमंत्र्यांची भेट घेत या महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यासाठी साकडं घातलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागणीचा योग्य तो विचार करू, असं आश्वासन यावेळी दिल्याची माहिती प्रभू यांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध नव्हताच- सुनील प्रभू
SHARES

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कधीच नव्हता. केवळ या प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा हीच आमची मागणी होती. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात येत असून शेतकरी खूश आहेत. त्यामुळं आता हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे. प्रभू यांच्या या स्पष्टीकरणामुळे समृद्धी महामार्गाला असलेला विरोध मावळल्याचं स्पष्ट झालं आहे.


चर्चेला कारण काय?

मुंबई-नागपूर हे अंतर कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या महामार्गाला शिवसेनेने विरोध करत अनेकदा या प्रकल्पावर टीका केली आहे. असं असताना काही दिवसांपूर्वी सावर्जनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या वतीने एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत या समृद्धी महामार्ग प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली. या मागणीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या नि शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध मावळला की काय? अशी चर्चा सुरू झाली.


मुख्यमंत्र्यांची भेट

अखेर ही चर्चा आता खरी ठरली आहे. सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच शिवसेनेच्या आमदारांनी विधीमंडळात मुख्यमंत्र्यांची भेट घेत या महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यासाठी साकडं घातलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागणीचा योग्य तो विचार करू, असं आश्वासन यावेळी दिल्याची माहिती प्रभू यांनी दिली आहे.


शेतकऱ्यांचा विरोध मावळला

तर, प्रकल्पाला शिवसेनेचा कधीच विरोध नव्हता. प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा, अशी शिवसेनेची आग्रही मागणी होती. ती मागणी पूर्ण होत नसल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. पण त्यानंतर मात्र सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळवून दिला आहे. त्यामुळं सध्या शेतकरी खूश आहेत. आता हा प्रकल्पही मार्गी लागत असल्याचही प्रभू यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा- 

समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, शिवसेनेची मागणी

शिवसेना नेत्यांची नावं मुंबई-पुण्यातच शोभतील, श्रीहरी अणे यांची टीका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा