Advertisement

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेना करणार राज्यव्यापी आंदोलन

मुंबईसह देशात मागील अनेक दिवसांपासून सतत पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. शिवाय महागाई देखील वाढत आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेना करणार राज्यव्यापी आंदोलन
SHARES

मुंबईसह देशात मागील अनेक दिवसांपासून सतत पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. शिवाय महागाई देखील वाढत आहे. ही वाढती महागाई सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करत आहे. सर्वसामान्य लोकांना मोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यात हे पेट्रोल डिझेलचे सतत वाढते दर हे सर्वसामान्यांना न परवडणारे झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. 

सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातही पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढविण्यात आल्या. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधीही शंभरीचा आकडा पार करु शकतात. त्यामुळे देशातील जनतेत नाराजी आणि असंतोष पहायला मिळत आहे. या काळात शिवसेना लोकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढिविरोधात शिवसेना राज्यात तीव्र आंदोलन करणार आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ५ फेब्रुवारी रोजी ११ वाजता शिवसेना पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून लोकांना सततच्या महागाईला समोरे जावे लागत आहे. सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्याची नीती केंद्रसरकारकडे नाही. 

महागाईच्या समस्येतून सर्वसामान्य जनतेला बाहेर काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचे आदेश दिले. केंद्रसरकार हे आंदोलन राज्यभारातील जिल्ह्याधिकारी कार्यालये आणि शासकीय कार्यालयांसमोर केली जाणार आहेत. सायकल, बैलगाड्या मार्च काढूव केंद्र सरकारविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा तीव्र निषेध केला जाणार आहे.

या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल होतील. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ५ फेब्रुवारीला इंधन दरवाढीविरोधात राज्यव्यापी आंदोलन करु असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. शिवसेनेच्या आंदोनलामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

महापालिकेकडून बेस्टला केवळ ७५० कोटींचे अनुदान

पुढील महिनाभरात सर्व टोल नाक्यांवर १०० टक्के फास्टॅगची अंमलबजावणी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा